विटा ( मनोज देवकर )
बेणापूर येथे खानापूर तालुक्याचे जेष्ठनेते रावसाहेब (आण्णा) शिंदे यांच्या कुटुंबियांची महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी रावसाहेब शिंदे आण्णांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या जाण्याने कुस्तीक्षेत्रावर मोठा आघात झाला आहे. गोरगरिबांना कायम रस्त्यावर उतरून मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आणि जनमानसात रमणारे त्यांचे व्यक्तिमत्व कायम स्मरणात राहील तसेच असे प्रतिपादन कदम यांनी केले.
यावेळी युवानेते जितेश कदम , वस्ताद श्री.राजेंद्र (तात्या) शिंदे श्री.श्रीकांत शिंदे, श्री.चंद्रकांत शिंदे , श्री.पंजाबराव दादा शिंदे, मा.श्री.सुहास(नाना) शिंदे, विटा चे उपनगराध्यक्ष श्री.अजित (दादा) गायकवाड, खानापूर तालुका कॉग्रेस अध्यक्ष श्री रविंद्र (आण्णा) देखमुख, खानापूर-युवक अध्यक्ष श्री जयदीपभैय्या भोसले युवानेते श्री.सुमितभैय्या गायकवाड व शिंदे परिवार यावेळी उपस्थित होता.
0 Comments