Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

जत तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व, मात्र महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर भाजपचा ताबा

जत (सोमनिंग कोळी)
जत तालुक्यातील २९ ग्रामपंचायत मतमोजणी सोमवारी पार पडली, या निवडणुकीत अधीकचा कौल काँग्रेसकडे असला तरी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शेगाव , उमराणी, उटगी,या ग्रामपंचयतीत सत्तांतर झाले आहे. या ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे. यातूनच काँग्रेसला सूचक इशारा दिला असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसने १६ ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्याचा दावा केला आहे, तर भाजपने १४ ग्रामपंचायतीवर दावा असल्याचे सांगितले आहे. रासपने कुडनूर ग्रामपंचायतीमध्ये खाते खोलले आहे. तर वळसंग ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांची निर्णयक भूमिका ठरणार आहे.

सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी प्रशांत आवटे व तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू केली. सुरवातीस पोस्टल मताची मतमोजणी झाली. त्यानंतर आठ फेऱ्यात 29 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले, टोनेवाडी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या विरुद्ध माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गटात प्रमुख लढती झाल्या तर राष्ट्रवादीने काही ठिकाणी उमेदवार तर काही गावात पॅनेल उभे केले होते. या निकालानंतर काँग्रेसने १६ ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्याचा दावा केला आहे, तर भाजपने १४ ग्रामपंचायत वर दावा केला आहे, राष्ट्रवादीने ३२ सदस्य आणि तीन ग्रामपंचायतीत सत्तेत असल्याचा दावा केला. जनसुराज्यने तीन ग्रामपंचायत मध्ये आमचे उमेदवार विजयी झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, आठ गावात स्थानिक आघाड्यानी यश मिळवले आहे. शिवसेनेचा एक सदस्य निवडून आला आहे. रासपनेही खाते खोलले आहे, या निवडणुकीतील लक्षवेधी बाब म्हणजे काँग्रेसने उटगी, उमराणी, सनमडी, तिकोंडी, अंकले, गुडापूर या ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता मिळवली आहे.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निडणुकीच्या दृष्टिकोनातून या निवडणुका महत्वाच्या होत्या.

उमराणी ग्रामपंचयतीमध्ये भाजपचे नेते अप्पासाहेब नामद, जिल्हा परिषद सदस्य मंगल नामद यांनी काँग्रेस नेते मल्लेश कत्ती याच्या ताब्यातील ग्रामपंचायतीवर ११ विरुध्द ४ जागा असे यश मिळवले आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली सनमडी ग्रामपंचयतीवर ९ पैकी ५जागा जिंकून काटावर यश मिळवले आहे.सनमडीत काँग्रेसला ४ जागेवर समाधान मानावे लागले आहे.अंकलेत जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील गटाचा पराभव अंकले ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील गटाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. तर भाजपचे नेते शंकर वगरे, कुंडलिक दुधाळ याच्या पॅनेलने यश मिळवले आहे. तिकोडी ग्रामपंचायतीत चार जागा काँग्रेसला तर भाजपला चार जागा बिनविरोध झाल्या होत्या. तीन जागेवर निवडणूक झाली यात दोन जागेवर भाजप एक अपक्ष निवडून आला आहे.

उटगी ग्रामपंचायत मध्ये भाजपने सत्तांतर घडवत काँग्रेसकडून सत्ता काबीज केली आहे. माजी सभापती बसवराज बिराजदार यांच्या पॅनेलने सर्वच्या सर्व जागा मिळून एकहाती सत्ता मिळविण्यात यश मिळवले आहे.
राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी शेगाव ग्रामपंचायत मध्ये भाजपचे लक्ष्मण बोराडे व सचिन बोराडे यांनी काँग्रेसच्या ताब्यात सत्ता खेचून घेण्यात यश मिळवले आहे. शेगाव भाजप व राष्ट्रवादी अशी आघाडी असल्याचे राष्ट्रवादी च्या नेत्यांनी सांगितले आहे.

तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत.यात काही ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. ग्रामपंचायत छोट्या असल्या तरी काँग्रेसने बाजी मारली. सिंगनहळळी येथे 9 पैकी 9 जागा काँग्रेसने मिळवल्या आहेत तर मेंढेगिरी 9 पैकी 9 जागा मिळवून एक हाती सत्ता संपादन केली आहे.धावडवाडी,येळदरी, गुगवाड, उंटवाडी, घोलेश्वर याठिकाणी काँग्रेसने यश मिळवले आहे. सिंगनहळ्ळी ग्रामपंचायत मध्ये विश्वजीत भगवान हिप्परकर व भाजपचे उमेदवार अनिल हिप्परकर यांना ३१३असे प्रत्येकी समान मतदान पडल्याने चिठ्ठी काढली.या विश्वजीत भगवान हिप्परकर हे विजयी झाले आहेत.

यश मिळाले पण....
: आमदार विक्रमसिंह सावंत

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनाधर काँग्रेसकडे आहे. तर काही गावात अल्पमतात मागे राहिलो आहे. तर जनतेने विकासासोबत असल्याचे दाखवून दिले आहे. परंतु काही मोठ्या गावात पराभाव झाला आहे . हे मान्य करावा लागेल याबाबतची कारणे शोधून नव्या जोमाने कामाला लागू. सर्व विजयी सदस्यांचे अभिनंदन आहे.सर्वांनी लोकप्रतिनिधी म्हणून विकासाला प्राधान्य देण्याचे काम करावे असेही आवाहन आमदार सावंत यांनी केले आहे.
.................................

१४ गावात भाजपाची सत्ता :
माजी आ. विलासराव जगताप

जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. तालुक्यातील निवडणुका झालेल्या 29 ग्रामपंचायत पैकी 14 ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आल्या आहेत. मोठ्या गावात भाजपने काँग्रेसचे पानिपत केले आहे .गेल्या वर्षभरात काँग्रेसच्या कारभारावर असंतोष आहे. याचेच पडसाद या निकालातून दिसून आले आहे. पुढच्या निवडणुकीतही चांगले यश मिळणार असल्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments