Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

निवृत्त पोलीस हवालदारसह पत्नी, मुलाची आत्महत्या; सांगली जिल्हा हादरला

सांगली (प्रतिनिधी)
जिल्हा पोलिस दलातील निवृत्त कर्मचारी अण्णासाहेब गव्हाणे यांनी त्यांचा मुलगा महेश आणि पत्नीसह बेळंकी गावात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेअर बाजारातील व्यवहारातून कर्जबाजारी झाल्याने ही आत्महत्या झाल्याचे सांगितले जात आहे.

सेवा निवृत्त पोलीस अण्णासो गुरसिद गव्हाणे (वय 65), पत्नी मालन अण्णासो गव्हाणे (वय 50) आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे अशी या आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. सांगली जिल्हा पोलिस दलात गोपनीय शाखेचे पोलिस म्हणून गव्हाणे यांनी प्रदीर्घ काळ सेवा केली होती.

निवृत्त पोलीस हवालदार गव्हाणे यांचे कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड तणावाखाली होते. शेअर मार्केट मधील गुंतवणूकीमुळे या कुटुंबाला कोट्यावधी रुपयांचे कर्ज झाले होते. बेळंकीतील मालमत्ता विकली तरीही अद्याप दीड कोटी देणे होते. त्यामुळे या तिघांनी पहाटे उटून आंघोळ, देवपुजा उरकून गळफास लावून घेतल्याची माहिती पुढे आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments