Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

नरसेवाडी गावच्या विकासासाठी सदैव तत्पर राहीन : अॅड. सदाशिवराव पाटील

विटा (मनोज देवकर)
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नरसेवाडी ग्रामपंचायत ही सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन अनावश्यक खर्च व वाद-विवाद टाळून बिनविरोध केली त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन. तुमच्या गावाला कोणतीही मदत लागो ती पूर्ण करण्यास मी कोठेही कमी पडणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करताना केले.

यावेळी सौ शर्मिला सिद्धनाथ जाधव, सौ मंगल पंढरीनाथ गुरव, संदीप वसंत सूर्यवंशी, सौ मनीषा गणेश जाधव, सौ कांचन दादासो जाधव,सुनिल नामदेव जाधव या ग्रामपंचायत सदस्यांचा व सोसायटी चेअरमन सावकर यशवंत जाधव तसेच सदाशिव भाऊ पाटील नरसेवाडी गटप्रमुख सिद्धनाथ (शेठ )जाधव व गणेश जाधव यांचा सत्कार सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला

यावेळी बी. आर. पाटील, महादेव जाधव, भिमराव जाधव, बाळासाहेब लवंड, शिवाजी जाधव, अंकुश जाधव, सागर जाधव, शंकर सूर्यवंशी, राजेंद्र जाधव, गणेश जाधव, बाळासाहेब जाधव, रमेश जाधव, लहू जाधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments