Daily Mahasatta

Daily Mahasatta

रेवानगरच्या विकासासाठी सदैव तत्पर : अॅॅॅड. वैभव पाटील

विटा ( मनोज देवकर )
रेवानगर (सुळेवाडी) च्या विकासासाठी आम्ही कायमच कटिबद्ध आहोत. कोणतेही नवीन काम असेल तर नक्की सुचवा,आपल्या गावच्या विकासासाठी सदैव तत्पर राहीन, असे आश्वासन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दिले.

विटा पालिका हद्दीतील रेवानगर येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी श्री. पाटील यांनी उपस्थितांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच व्यायामशाळा आणि बुचडे मळा येथील रस्ता अशा विविध विकास कामांची सुरुवात लवकरच होत असून अन्य कोणतेही नवीन काम असेल तर नक्की सुचवा, आपल्या गावच्या विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन. या गावातील प्रत्येक कार्यकर्ताच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहीन, अशी ग्वाही हि पाटील यांनी दिली. यावेळी गावातील विकास कामाबद्दल सांगोपांग चर्चा झाली 

यावेळी नगरसेवक अरुण गायकवाड, अविनाश चोथे, पवन पोळ, प्रमोद सुळे, अशोक पवार, मनोज पवार, शुभम नलवडे, सतीश सावंत, नानासो पवार, आनंदा डिसले, महादेव पवार, गणेश बाबर, महादेव चव्हाण, महादेव सावंत, गोरख पवार, संजय पवार, फंटा सुळे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments