Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

मसुचीवाडी ग्रामपंचायतीत आघाडीचा विजय

वाळवा (प्रतिनिधी)
मसुचीवाडी ग्रामपंचायतमध्ये वाॕर्ड नंबर 4 चा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये जनसेवा स्वाभिमानी आघाडी व ग्रामविकास पॕनेल याच्या संयुक्त आघाडीने बाजी मारली. या अगोदर 9 जागा बिनविरोध झालेल्या होत्या तर 4 नंबर वाॕर्डात दोन जागांची निवडणूक लागली होती. त्याचा आज निकाल जाहीर झाला. एकूण मतदान 603 झाले होते यापैकी अमित कदम(361) अमोल कदम(231) नोटा (5) मते पडली यामध्ये आघाडीचे अमित कदम 124 मतानी विजयी झाले. तर आ. जा. महीला मधून सौ. राधिका पाटोळे (342) सौ. अनुराधा पाटोळे (234) सौ.ज्योती पाटोळे (21) व नोटा (6) मते पडली येथे आघाडीच्या सौ. राधिका पाटोळे 108 मतानी विजयी झाल्या आहेत.

यावेळची निवडणूक ही पारंपारिक विरोधक एकत्र येऊन झाली. त्यामुळे हुतात्मा गट हा बाजूला पडला होता.परंतु शेवटच्या टप्प्यात त्यांनी अपक्ष उमेदवारांना पाठींबा देऊन आपली ताकद दाखवून देण्याचे काम केले. दोन्ही गट एकत्र येऊन ही हुतात्मा गटाने चांगली झूंज दिल्याचे निकालानंतर दिसून आले. यावेळची निवडणूक जर तिरंगी झाली असती तर निकाल हे चमत्कारिकच दिसले असते.

आघाडीच्या उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला. यावेळी सरपंच पदाचे आरक्षण हे निवडणूकी नंतर निघणार असून सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? हे सोडत झाल्यानंतर समजेल.

Post a Comment

0 Comments