Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

वाढदिवस...चक्क स्मशानभूमीत साजरा, पहा कसा...

पेठ (रियाज मुल्ला)
पेठ ता. वाळवा येथील एम. एम. ग्रुप चे सामाजिक कार्यकर्ते गोरख मदने यांनी वाढदिवसनिमित होणारा खर्च टाळून पेठ येथील स्मशान भूमीची स्वछता करून एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. त्यांच्या या कार्याचे परिसरातून कौतूक होत आहे.

वाढदिवस म्हंटले की डॉल्बी, फटाक्यांची आतिषबाजी, जेवणावळी, पार्ट्या असले प्रकार बघायला मिळतात. तर काहीजण स्वतःचा वाढदिवस अनाथ आश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी अन्नधान्याच्या , कपड्यांच्या, देणगी स्वरूपात हि साजरा करतात मात्र पेठ येथील एम. एम. ग्रुप चे सामाजिक कार्यकर्ते गोरख मदने यांनी फटाके ,डॉल्बी, जेवणावळी च्या पार्ट्या ना फाटा देत वाढदिवसनिमित पेठ परिसरातील स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबविला. आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केलेल्या वाढदिवसाची चर्चा अन कौतुक पेठ परिसरातून होत आहे.

येथील उमाजीनगर,भीमनगर,गोळेवाडी, शिंपी समाज स्मशानभूमी आदी परीसरातरातील स्वच्छता करण्याचे आदर्शवत काम त्यांनी केले असून त्यांच्या सोबत अक्षय मदने, अक्षय जाधव, अर्जुन शिरतोडे, अजित जाधव, विजय जाधव, रणजित जाधव, अर्जुन गुजले, सनी जाधव, सुरज मदने, दिनेश मदने आदीं कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

1 Comments