Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या महिला जिल्हाध्यक्ष पदी मा. उषा गायकवाड यांची निवड

सांगली (प्रतिनिधी)
महाराष्ट्र नाभिक महामंडळ सांगली जिल्हा अंतर्गत महिला आघाडी च्या अध्यक्षपदी उषा जनार्दन गायकवाड (माई) यांची निवड करण्यात आली. सह्याद्रीनगर सांगली येथे पार पडलेल्या बैठकीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे सर यांच्या हस्ते त्यांना निवडपत्र देण्यात आले.

यावेळी प्रा. साळुंखे सर यांनी संघटनेच्या भावी वाटचाली संदर्भात भुमिका स्पष्ट करत व नूतन अध्यक्षा माईंना शुभेच्छा देत महिला आघाडीच्या बांधणीसंदर्भातही मार्गदर्शन केले. विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष तेजस सन्मुख यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा थोडक्यात सादर केला. यानंतर नुतन महिला आघाडी अध्यक्षा उषा गायकवाड माई यांनी जिल्हा संघटनेच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे सांगत पदाचा कोणताही बडेजाव न करता सर्व महिलांना एकत्र घेऊन काम करणार असल्याचे सांगितले.

यावेळी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष प्रा. साळुंखे सर, जिल्हा उपाध्यक्ष नंदू (आप्पा) सपकाळ, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष तेजस सन्मुख, जिल्हा सचिव मधुकर गायकवाड, जिल्हा युवक सचिव नितीन खंडागळे, मिरज तालुकाध्यक्ष अनिल बने, राकेश अस्वले, संदीप गंगधर, सुमित मर्दाने, महेश साळुंखे, सौरभ सपकाळ सुवर्णा काशीद, सुरेखा माने, स्वाती पाटील, रुपाली गायकवाड अमिता गवळी, विद्या पवार, संगीता सन्मुख, सीमा गायकवाड, रचना झेंडे, तेजस्वी गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments