Daily Mahasatta

Daily Mahasatta

खानापूर तालुक्यात ग्रामपंचायतीला ७६.५१ टक्के मतदान

विटा ( मनोज देवकर )
खानापूर तालुक्यात ७६.५१ टक्के मतदान झाले. तालुक्यात एकूण ११ गावांमध्ये २० हजार १७७ मतदार होते. १५४५७ लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वात जास्त ८६ टक्के मतदान खंबाळे ( भा.) येथे झाले असून पारे येथे ६५.६७ टक्के मतदान झाले आहे.

तालुक्यातील सर्वच गावात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून मतदान केंद्रांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी बाळगली जात होती. मात्र गावात इतरत्र सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहण्यात आला. अनेक पोलिंग बूथवर कार्यकर्ते गर्दी करून उभे होते.

माहुली येथे ७०.७२ टक्के , नागेवाडी मध्ये ८०.१८ टक्के , मंगरूळ येथे ७९.५० टक्के मतदान झाले. भिकवडी बुद्रुक येथे ८१.४१ टक्के , देवीखिंडी ७८.८७ टक्के , रेणावीत ७४.८४ टक्के , पोसेवाडी मध्ये ७१.९१ टक्के , शेंडगेवाडी ८१.७२ टक्के , मेंगाणवाडी ७६.४२ टक्के मतदान झाले आहे. तांदळगाव आणि भडकेवाडी च्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत.

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि विक्रमवीर माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव दादा पाटील यांचे नातू अभिजित पाटील मंगरूळ येथील वार्ड क्रमांक १ मधून निवडणुकीला उभे होते. त्यांच्या विरोधात आमदार बाबर यांचे कट्टर समर्थक प्रशांत शिंदे उभे आहेत. त्यांचे वडील सुरेश शिंदे खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होते. येथील लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

माहुली येथील वार्ड क्रमांक तीन मधून माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील आणि माजी पंचायत समिती सभापती भारती पाटील यांचे पुतणे प्रणव प्रकाश पाटील नशीब आजमावत आहेत. या वार्डात इतर चार उमेदवार उभे होते त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची झाली आहे.

Post a Comment

0 Comments