Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कुपवाड मध्ये पत्रकार दिन उत्साहात संपन्न

कुपवाड (प्रमोद अथणिकर)
आज नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या उपाध्ये गर्ल्स हायस्कूल येथे कुपवाड शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

जेष्ठ पत्रकार सुधीर कुलकर्णी , सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे साहेब एम. आय. डी. सी. पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक निरज उबाळे व नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब उपाध्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.

कुपवाड शहर पत्रकार संघाचे संस्थापक मा. सन्मती गौंडाजे यांनी प्रास्ताविक केले. कुपवाडच्या पत्रकारितेचा इतिहास सांगितला. यावेळी पत्रकार स्नेहल गौंडाजे, बाळासाहेब मलमे, अब्दुलगणी मुजावर ,सुभाष पाटील, महावीर पाटील, प्रवीण मिरजकर , प्रमोद अथनिकर, कुंदन जमदाडे यांचा मान्यवरांनी सत्कार केला. प्रवीण कोकरे, महावीर कोथळे, कुमार केंपवाडे, श्रीशैल्य मोटगी, विनायक जोशी, मुख्याध्यापक चिरमे यासह विद्यार्थी- विद्यार्थीनी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

Post a comment

0 Comments