Daily Mahasatta

Daily Mahasatta

जतच्या प्रांताधिकाऱ्यांची वाळूमाफियांवर धडक कारवाई

: ३ जेसीबी,२ टॕक्टर,१ डंपर ताब्यात
संख (रियाज जमादार )
जत तालुक्यात वाळू तस्करीवर आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. प्रांताधिकारी प्रशांत आवटे आणि जतचे तहसीलदार सचिन पाटील यांनी अचानकपणे अप्पर तहसीलदार यांना वगळून जत पूर्व भागातील संख अप्पर हद्दीत छापेमारी केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

यावेळी त्यांच्यासमवेत जतचे तहसिलदार सचिन पाटील ,संख मंडळ अधिकारी मनहोर कोळी, तलाटी राजेश चाचे, एन. डी. सागोलकर, बी. एस जगताप, एस. डी. बागेळी, गणेश पवार, निकील पाटील , कोतवाल कामराज कोळी, उमदी पोलीस ठाणेचे पोलिस उप निरीक्षक नामदेव दाडगे, इंद्रजित गोदे, विक्रम गोदे आदीजन कारवाईसाठी उपस्थित होते.

जत तालुक्यातील संख ,सुसलाद,करजगी, उमदी,नदीतून होणारा बेसुमार वाळू उपसा उजेडात आणत काल पहाटेच्या सुमारास स्वतः प्रांताधिकाऱ्यांनी तीन जेसीबी, एक डंप्पर , दोन टॕक्टर असे एकूण सहा वाहनावर कारवाई करत वाहने जप्त करण्यात आली आहे.

जत पासून पूर्व भागातील बोर नदी पात्र हे ६४ किलो मिटर अंतर आहे. या बोर नदीतून वाळू उपसा होत असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे शेतीचे मोठे नूकसान होत आहे. अनेक संघटनांनी अवैद्य वाळू उपसा विरोधात निवेदन देऊनही येथील अवैध वाळू तस्करी सुरूच असल्याने संख अप्पर तहसीलदार यांना वगळून जतचे प्रांताधिकाऱ्यांच्या टीमने धडक कारवाई करत वाळू तस्कऱ्यांना व पाठबळ देणाऱ्यांना दणका दिला आहे.

Post a Comment

0 Comments