Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

जत तालूक्यात कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

जत, (सोमनिंग कोळी )
जत तालुक्यातील शेगाव येथे सचिन इराप्पा नाईक (वय ३२ ) यांनी वाहनकर्जाचा वाढता बोजा असह्य झाल्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.

मयत सचिन यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते . लॉकडाऊनच्या तब्बल सात महिन्यांच्या कालावधीत धंदा पूर्णपणे बंद होता. तरीही सचिन यांनी उसनवारी करुन हप्ते बिनचूकपणे भरले. परंतू, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर देखील वाहन व्यवसायातील घडी पूर्ववत होत नसल्याचे वाढते नैराश्य आणि मानसिक तणाव असह्य झाल्याने त्यांने आत्महत्येचा दुर्दैवी निर्णय घेतला.

सचिन नाईक यांचे कुटूंबात आई, वडील,पत्नी, दोन लहान मुले आणि एक भाऊ असा परिवार आहे. कुटूंबातील कर्ता पुरुष गेल्याने हे कुटूंब उघड्यावर पडले आहे. शासनाने या कुटूंबास त्वरित आर्थिक मदत देण्याची गरज तर आहे. ऐन लॉकडावूनच्या कालावधीत सात महिने वाहन धंदा बंद असतानाही सचिन यांनी संबंधित फायनान्स कंपनीविरुध्द कुठेही तक्रार न करता खाजगी उचल उसनवारी करुन सर्व हप्ते प्रामाणिकपणे बिनचूक भरले आहेत. त्यामुळे या कंपनीने देखील हे कुटूंब सावरण्यासाठी आर्थिक भार उचलावा, अशी मागणी कुटूंबियांनी केली आहे.

Post a comment

0 Comments