Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

विटेकरांना मिळाले १२ कोटींचे गिफ्ट

 विटा ( मनोज देवकर ) 
विटा शहराच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून शहराच्या अंतर्गत रस्ते डांबरीकरण आणि काही रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी बारा कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अमोल बाबर यांनी दिली. आम. बाबर यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते , जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर , माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील , उत्तमराव चोथे , विनोद गुळवणी , संजय मेहरबान , रामचंद्र भिंगारदेवे , पंचायत समिती सभापती महावीर शिंदे उपस्थित होते.

एवढ्या मोठ्या प्रमाणात विटा नगरपालिकेला पहिल्यांदाच निधी मिळाला आहे. यात प्रशासनाने आणि पदाधिकाऱ्यांनी विकासकामात सहकार्य करावे असे आवाहन अमोल बाबर यांनी केले. डांबरी रस्त्यांचे आयुष्य आणि दर्जा याबाबत नेहमी साशंकता राहते. पुणे , मुंबई या शहरात अंतर्गत रस्ते ही ट्रिपल लेयर काँक्रीट असतात. तसे दर्जेदार रस्ते विटेकरांना अनुभवायला मिळावेत म्हणून प्रायोगिक तत्वावर टेलिफोन एक्सचेंज ते खरेदी विक्री संघ आणि यशवंतराव चव्हाण पुतळा ते संगम मेडिकल पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण आणि आरसीसी गटार या कामासाठी निधी मंजूर झाल्याची माहिती सुहास बाबर यांनी दिली.

आज आमदार अनिलभाऊ बाबर यांचा वाढदिवस. याच दिवशी शहराच्या विकासासाठी १२ कोटीचा निधी मिळाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे वाढदिवस अनिलभाऊ यांचा मात्र गिफ्ट विटेकरांना अशी चर्चा रंगली होती.

Post a comment

0 Comments