Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरा हादरा; माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

विटा ( मनोज देवकर )
विटा नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यांवर आली असल्याने कार्यकर्त्यांचे इनकमिंग आणि आऊट गोइंग जोरात सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी युवानेते पंकज दबडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई मध्ये जाऊन भाजप प्रवेश केला होता. आज नगरपालिकेचे माजी नगरसेवक सीतारामशेठ बुचडे यांनी आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या हस्ते "शिवबंधन" बांधून सेनेत प्रवेश केला. त्यामुळे महिन्याभरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदाशिव पाटील गटाला दुसरा हादरा बसला आहे.

बुचडे यांच्यासह पंचशील नगर , रेवानगर परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज शुक्रवार सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केला. आ. अनिल बाबर यांच्या हस्ते सीताराम बुचडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहासभैय्या बाबर, नगरसेवक अमर शितोळे, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, ईश्वर शेठ जाधव, उत्तम पवार सर, उत्तमराव चोथे, रामचंद्र भिंगारदेवें , सोमनाथ सुळे , निलेश गुरव , अमोल पवार , मुकुंद लकडे , अनिल औताडे, दामोदर पवार, अनिल हराळे , विजय संकपाळ, नारायण पवार , प्रकाश पवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. बाबर म्हणाले , " कुणालातरी कमीपणा यावा म्हणून असे कार्यक्रम घेत नाही. विकासाची चेन्नई एक्सप्रेस रेवानगर , पंचशील नगर मध्ये धावली पाहिजे म्हणून प्रयत्न करणार आहे. सीताराम आप्पा यांची " पालखी मार्ग व्हावा व रेवानगर परिसराचा विकास व्हावा ही इच्छा आहे" त्यांच्या आणि इथे जमलेल्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून काम करणार आहे. २०१४ साली मी शिवबंधन बांधलं, कलर उडाला पण गाठ ढिल्ली झाली नाही . असे म्हणत त्यांनी आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. इथल्या शेतीच्या पाण्याच्या साठी टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या काही महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू होईल असे प्रतिपादन बाबर यांनी केले. सीताराम बुचडे यांनी " इथून पुढे कायम अनिल भाऊंच्या सोबत ठाम उभे राहू..!" असा विश्वास व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments