Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड मध्ये तिघांवर खुनी हल्ला; दोनजण गंभीर जखमी

कुपवाड (प्रमोद अथणिकर)
पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन
कुपवाड परिसरातील लक्ष्मी नगर येथे तीनजणांवर तलवार हल्ला करण्यात आला आहे . यामध्ये दोघेजण गंभीर तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. बिरु पुजारी, अक्षय कोळेकर आणि प्रवीण धायगुडे ( सर्व रा. बारदान गोडाऊन जवळ कोंडकेमळा) अशी हल्लेखोरांची नावे असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कुपवाड परिसरातील लक्ष्मी नगर मध्ये पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बिरु पुजारी (रा. बारदान गोडाऊन जवळ कोंडकेमळा) ,अक्षय कोळेकर (बारदान गोडाऊन जवळ कोंडके मळा ) व प्रवीण धायगुडे रा बारदान गोडाऊन जवळ कोंडके मळा ता. मिरज यांनी त्यांच्या जवळ असलेल्या तलवारीने अरविंद खांडेकर (रा हौसिंग सोसायटी लक्ष्मी नगर) ,विजय कोळेकर (रा लक्ष्मीनगर) व प्रवीण धायगुडे (रा लक्ष्मी नगर) असे एकूण तिघांवर तलवारीने जीवघेणा हल्ला करून त्यांना जखमी केले.

या प्रकरणातील तिघां संशयित आरोपीना न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. घटनास्थळी तातडीने उप विभागीय पोलीस अधिकारी विरकर यांनी भेट देऊन पाहणी केली असून या गुन्ह्याचा अधिक तपास पो नि निरज उबाळे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments