Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

जनतेची ' साथ ' अनिलभाऊंना ; 7 ग्रामपंचायतीवर भगवा

विटा ( मनोज देवकर )
खानापूर तालुक्यात तेरा ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. सात ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या आमदार बाबर गटाच्या कार्यकर्त्यांनी यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाचे कार्यकर्ते तीन ग्रामपंचायत जिंकण्यात यशस्वी ठरलेत. मंगरूळ (चिंचणी) ग्रामपंचायत काँग्रेस च्या रामराव दादा पाटील यांच्या पॅनल ने जिंकली असून भडकेवाडी ग्रामपंचायत माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जिंकली आहे. 
देवीखिंडी ग्रामपंचायत निवडणुकीत पारंपारिक विरोधक असलेले बाबर आणि पाटील गट एकत्र आले होते. त्यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली होती, त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली नाही. बाबर आणि पाटील या दोन्ही गटांनी अडीच अडीच वर्षे सरपंच पद , तंटामुक्ती अध्यक्ष आणि उपसरपंच पद वाटून घेण्याचे ठरवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 
सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकी नंतर जाहीर होणार असल्यामुळे पूर्ण पॅनल निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. बहुतांश ग्रामपंचायती मध्ये पूर्ण पॅनल जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे सात ग्रामपंचायत मध्ये सरपंच बाबर गटाचा असेल. तांदळगाव , खंबाळे , पारे , रेणावी , मेंगाणवाडी, नागेवाडी , माहुली या ग्रामपंचायती बाबर गटाने जिंकल्या आहेत. मंगरूळ ग्रामपंचायत काँग्रेस च्या रामराव दादा पाटील गटाने तर भडकेवाडी सुहास शिंदे गटाने जिंकली आहे. देवीखिंडी बाबर आणि पाटील गटाच्या युतीची सत्ता असेल. पोसेवाडी , भिकवडी , शेंडगेवाडी या ग्रामपंचती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदाशिवराव पाटील गटाने जिंकल्या आहेत. 
    भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा पडली असून, आमदार गोपिचंद पडळकर यांनी खरेच कार्यकर्त्यांना बळ दिले का ? हा प्रश्नच आहे.

Post a Comment

0 Comments