Daily Mahasatta

Daily Mahasatta

28 कोटीचे सोने जप्त; आटपाडीतील दोघांना अटक

विटा ( मनोज देवकर )
दिल्ली झोनल युनिटच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गुरुवारी दिल्ली आणि लखनऊ या दोन ठिकाणी आठ जणांकडून 28 कोटी रुपये किंमतीचे 55.61 किलोग्राम सोने जप्त केले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठ जणांपैकी चार जण हे सांगली जिल्ह्यातील असल्याने खळबळ माजली आहे.

याबाबत खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना लॉकडाऊन दरम्यान सर्व हवाई मार्ग बंद होते आणि सर्व मार्गांवर सुरक्षा यंत्रणा सजग होती. याकाळात म्यानमारहून भारत-म्यानमार सीमामार्गे आणि भारताच्या वेगवेगळ्या भागांतून भारतात विदेशी सोन्याचे तस्करी करण्याचे प्रमाण वाढल्याचे डी आर आय आणि तपास यंत्रणेला लक्षात आले असून त्यादृष्टीने सजगता वाढवण्यात आली आहे .

एकवीस जानेवारी रोजी डी आर आय ने पाच प्रवाशांना दिल्ली येथे आणि तीन प्रवाशांना डीआरआय, लखनऊ झोनल युनिट यांनी लखनौ येथे रंगेहात पकडले . यावेळी दोन्ही ठिकाणी मिळून ५५ .६१ किलोग्रॅम वजनाच्या बार्स आणि 335 सोन्याच्या पट्ट्या आरोपी कडून जप्त केल्या गेल्या आहेत. या 8 जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे, असे अर्थमंत्रालयाने सांगितले आहे. अटक करण्यात आलेल्या आठ तरुणांपैकी चार जण सांगली जिल्ह्यातील असून त्यापैकी दोघेजण आटपाडी तालुक्यातील कौठुळी गावचे आहेत .

केंद्रीय अर्थखात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी डी आर आय च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल कौतुक केले. मंत्री अनुराग ठाकूर यांनी जप्त करण्यात आलेल्या सोन्याची पाहणी केली.

Post a Comment

0 Comments