Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

तालुक्यात पीएम किसान योजनेचे १६९५ लाभार्थी अपात्र, जमा झालेले पैसे परत करावे लागणार.

विटा ( मनोज देवकर )

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अपात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कडून जमा झालेले पैसे परत भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. खानापूर तालुक्यातून एक कोटी तेत्तीस लाख रुपये वसूल करण्यात येणार आहेत. आयकर भरल्यामुळे अपात्र ठरलेल्या १६५६ व इतर कारणांमुळे अपात्र ठरलेल्या ३९ लोकांना सात दिवसात जमा झालेले पैसे परत करण्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

" सदर योजनेसाठी अर्ज करत असताना अनेक शेतकऱ्यांनी आयकर भरत असल्याची माहिती दडवली होती. सरकार कडून अशा अपात्र शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन जाहीर करण्यात आली आहे. या अपात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर आजअखेर दोन हजार रुपयांचे तीन ते चार हफ्ते जमा झाले आहेत. हे पैसे शेतकऱ्यांना त्या त्या गावच्या तलाठी यांच्याकडे जमा करायचे आहेत. त्यासाठी पावती पुस्तके देण्यात आली आहेत.
-------------------------------------
निधी शासनाकडे
वर्ग करणार....
आजअखेर २१६ लोकांनी १६ लाख ९५ हजार जमा केले आहेत. सदरची रक्कम एका स्वतंत्र अकाउंट वर जमा करण्यात येत आहे. ती नंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे वर्ग करण्यात येईल "
ऋषिकेत शेळके,
तहसीलदार खानापूर - विटा

Post a comment

0 Comments