Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

इथेनॉल निर्मिती प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा : मंत्री जयंतराव पाटील

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
इथेनॉल निर्मिती प्रकल्प शेतकऱ्यां च्या हिताचा आहे. यातून साखर कारखान्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. साखराळे युनिटमध्ये दिवसाला ७८ हजार लिटर इथेनॉल निर्मिती केली जाणार असून वाटेगाव-सुरुल युनिटमध्ये नजीकच्या काळात दिवसाला १ लाख ५० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारला जाणार असल्याचा विश्वास राज्याचे जलसंपदामंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी विभागात ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचा ना. पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. राजारामबापू सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजयबापू पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांच्या हस्ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

ना. पाटील म्हणाले, अतिरित साखर उत्पादन हा साखर उद्योगासमोरील मोठा प्रश्न आहे. साखरेचे उत्पादन करून साखर गोडावूनमध्ये ठेवायची. सात,आठ,नऊ महिन्यांनी साखर विकल्यावर पैसे मिळणार. तोपर्यंत साखर कारखान्यांना प्रत्येक पोत्यास २५० ते २७५ रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड बसतो. एफआरपी १४ दिवसांच्या आत देणे कायद्याने बंधनकारक आहे. आपण इथे तयार केलेले इथेनॉल ऑइल कंपनीस विकल्यावर १५ दिवसात पैसे मिळू शकतात. साखराळे युनिटमध्ये ७ हजार मेट्रीक टन दिवसाला गाळप करतो, त्यातील एक हजार मेट्रीक टन उसाचा रस घेवून त्यापासून प्रतिदिन ७८ हजार लिटर इथेनॉल तयार करणार आहोत. साखरेचे दर वाढले, तर हे करता येणार नाही. प्राज या जगातील उत्तम कंपनीकडून आपला प्रकल्प उभा केला आहे. त्यापूर्वी अनकेदा चर्चा,व्हीएसआयच्या तज्ञांचे मार्गदर्शन घेतलेले आहे. आपण आपल्या चार युनिटमध्ये दिवसाला १६ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप करीत आहे. काही युनिटमध्ये सुधारणा करून दिवसाला २० हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप करू शकतो. तसेच भविष्यात कारंदवाडी, जत युनिटमध्ये वेगळ्या उपपदार्थांचे उत्पादन घेवू शकतो. केंद्र सरकार कडून अनुदानाचे ९२ कोटी येणार आहेत. आपण बिल देण्यास ५० कोटीचे कर्ज काढले. यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत.

यावेळी प्राज कंपनीचे उदय कुलकर्णी,अभिजित पोटे, राकेश कुमार,सुमित रानडे,नदीम मोमीन, इंडप्रो इलेक्ट्रॉनिकचे मानसिंग पडवाल,राजारामबापू साखर कारखान्याचे जनरल मॅनेंजर एस. डी. कोरडे,डिस्टीलरी मॅनेंजर धैर्यशील पाटील,चीफ इंजिनिअर विजय मोरे,चीफ केमिस्ट सुनील सावंत,बांधकाम कंत्राटदार रियाज मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला.

सभापती शुभांगी पाटील, इस्लामपूरचे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,आष्टयाच्या नगराध्यक्षा स्नेहा माळी,उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे, माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील, अरुण कांबळे, सौ. छायाताई पाटील, सुस्मिता जाधव, शहाजी पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अँड. विश्वासराव पाटील, उपसभापती सुरेश गावडे, बाळासाहेब पवार, शिवाजी मगर, रुपाली सपाटे, सूर्यकांत पाटील, प्रताप पाटील, शंकरराव भोसले, तानाजी खराडे, राजेंद्र चव्हाण यांच्यासह कारखान्याचे संचालक,ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी,प्राज कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी आभार मानले. प्रसिध्दी अधिकारी विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्र संचालन केले.


■■■■■■■■

Post a comment

0 Comments