सांगली (प्रतिनिधी)
कॉंग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस
31 डिसेंबर रोजी होत आहे. या निमित्त केंब्रिज स्कूल सी बी एस ई मिरज येथे विविध स्पर्धा
पार पडल्या आहेत , अशी माहिती सयोजकांनी
दिली आहे.
यामध्ये ईयत्ता 9 वी आणि 10 वीच्या वर्गांसाठी वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये 1) सामाजिक माध्यम शाप की वरदान 2) परीक्षा या केवळ मुलांच्या स्मरण शक्तीचेच मूल्यमापन करतात का ? 3) आजच्या फॅशनला मुले बळी पडतात का ? या विषयावर मुलांनी आपली मते मांडली. परीक्षक म्हणून इम्तियाज पटेल यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच ईयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विध्यार्थ्यानसाथी भेट कार्ड तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. तर पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी चित्र रेखांकन स्पर्धा झाली.
0 Comments