Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सम्राट महाडिक यांचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
जिल्हाचे युवा नेते व भाजपा प्रदेश कार्यसमिती सदस्य सम्राट महाडीक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिराळा व वाळवा तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेची सभापती जगन्नाथ माळी व शिराळयाचे नगरसेवक केदार नलवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री माळी म्हणाले, सम्राट महाडीक यांचा
वाढदिवस नेहमीच उत्साहाने साजरा होत असतो. कर्तुत्वान युवानेत्याला कामाची पोच पावती म्हणून कार्यकर्ते व सामान्य नागरीक यांच्याकडून शुभेच्छाचा वर्षाव होत असतो. यावर्षी देखील शिराळा व वाळवा, इस्लामपूर मतदारसंघामध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने इस्लामपूर येथे रक्तदान शिबीर, नेर्ले येथे वृध्दआश्रमातील नागरीकाची मोफत आरोग्य तपासणी, रक्त तपासणी व मोफत औषध वाटप शिराळा येथे दिव्यांगाना व्हिलचेअर वाटप व महिलांना साडी वाटप तसेच कोकरूड, शिरशी ता शिराळा येथे आरोग्य केंद्रात मास्क व सॉनिटायझर वाटप कामेरी, शेणे येथील शालेय विदयार्थ्याना वहयावाटप, मांगले ता. शिराळा कोविड योध्दांचा सत्कार मास्क सांनिटायझर व जेवणाचे डबे वाटप, पेठ येथे भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा, चिंचोली ता. शिराळा येथे किकेट स्पर्धा येडेनिपाणी बाकडी व खाऊ वाटप, मालेवाडी येथे रक्तदान व आरोग्य शिबीर, इस्लामपूर येथे वृक्षारोपन, आष्टा येथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप, तसेच इस्लामपूर येथे रक्तदान शिबीर(महादेव नगर), सागाव ता. शिराळा येथे पाक कला प्रशिक्षण कार्यशाळा, ऐतवडे बु।। रक्तदान
शिबीर, खाऊ वाटप, फळे वाटप, वृक्षारोपन, क्रिडा स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांची आयोजन करणेत आले आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलाणी, मा. नगरसेवक सतिश महाडीक, माजी नगरसेवक कपील ओसवाल, नगरसेवक अमित ओसवाल, मोहन मदने, नगरसेवक, चेतन शिंदे, सुजित थोरात, प्रविण चिकुर्डेकर, जलाल मुल्ला,अमिर ढगे, शंकर पाटील, डॉ. सचिन पाटील, सुमित पाटील, शरद जाधव, रोहित जाधव व युवा शक्तीचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

Post a comment

0 Comments