Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

अवघ्या चार तासात विट्यातील अट्टल चोरटा जेरबंद

विटा ( मनोज देवकर )
येथील विश्वविनायक हॉस्पिटल समोरील पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या टाटा नेक्सन कारची काच फोडून गाडीतील तीस हजार रुपयांचा सॅमसंग नोट ८ मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार विशाल ठोबरे ( रा. विटा ) यांनी दाखल केली होती. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज च्या सहाय्याने विटा पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपी श्रीकांत मलाप्पा केंगार ( रा. विटा, वय १९ ) याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीला गेलेला महागडा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपीने सकाळी साडे सहाच्या सुमारास पार्किंग मधील टाटा नॅनो व टाटा नेक्सन कार च्या काचा फोडल्या . तिथेच उभ्या असलेल्या मोटर सायकल ची तोडफोड ही केली होती. तशी तक्रार फिर्यादी यांनी दिली आहे. फिर्यादींनी तक्रार दिल्यानंतर विटा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे यातील आरोपीला चार तासात पकडण्यात आले. आरोपी १९ वर्षांचा तरुण असून त्याच्या कडील चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक सुरेश भोसले करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक रवींद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र भिंगारदेवे , हणमंत लोहार , अमर सूर्यवंशी , शशिकांत माळी , सुरेश भोसले यांनी पार पाडली .

Post a comment

0 Comments