Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

रक्तदानासाठी शासनाचा पुढाकार, ३१ डिसेंबर ला कडेगावात रक्तदान

कडेगाव ( सचिन मोहिते)
कडेगाव येथे गुरूवार दि ३१ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय कडेगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी इच्छुक लोकांनी रक्तदान करावे असे आवाहन कडेगाव पलूस चे प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलं आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हंटलं आहे की, सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यामध्ये शासकीय व खाजगी रक्तपेढ्यांमध्ये गरजू रुग्णांसाठी दररोज १०० रक्ताच्या पिशव्या दिल्या जातात .सद्यस्थितीत जिल्ह्यातील रक्तपेढ्या कडील संकलित रक्ताचा साठा पाहता रुग्णांसाठी सहा ते आठ दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे .त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारीसो सांगली यांचे कडील आदेश प्राप्त झाला असून त्याअन्वये कडेगाव येथे उपविभागातील ग्रामीण रुग्णालय कडेगाव येथे ३१ डिसेंबर २०२० रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे .सदर रक्तदान शिबिरासाठी डॉ आशा चौगुले, तालुका आरोग्य अधिकारी कडेगाव ,यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. तरी कडेगाव तालुक्यातील स्वयंसेवी संस्था विविध क्रीडा व सांस्कृतिक मंडळ महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक यांनी दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी ग्रामीण रुग्णालय कडेगाव येथे उपस्थित राहून रक्तदान करावे.

Post a comment

0 Comments