Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगलीच्या सूंदरनगर वेश्या वस्तीत वारांगना महिलांचा कँडल मार्च

सांगली (प्रतिनिधी)
: जागतिक एड्स विरोधी दिनी सांगलीच्या सुंदरनगर वेश्या वस्तीतील वारांगना महिलांनी कँडल मार्च करीत एड्सने बळी पडलेल्याना श्रद्धांजली वाहिली. वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सांगलीच्या सुंदर नगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून 1 डिसेंबर या जागतिक एड्स विरोधी दिन साजरा केला जातो. संस्थेच्या अध्यक्ष अमिराबी शेख यांनी या उपक्रमाची सुरवात केली आहे. आजही ही परंपरा कायम आहे. एड्स विरोधी दिनी सर्व वारांगना एकत्र येत एड्सने बळी पडलेल्याना श्रद्धांजली वाहतात. यानिमित्त कॅडल मार्च करीत एड्स पासून दूर राहण्याची शपथ सुंदर नगर मधील वारांगना महिलांनी घेतली. नगरसेविका अनारकली कुरणे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम घेण्यात आला.

या उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण आणि जमीर कुरणे यांनी केले. यावेळी संस्थेच्या संचालक सैफिन शेख, राधा हातलगे, गंगवा परलंकी, गोदा भुसानी, यमनवा केंचकणावर, मलवा हिरामनी, चंद्रवा हिरामनी आदींनी यात सहभाग घेतला होता.

Post a comment

0 Comments