Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

टेंभू कालव्याच्या जमीन खरेदीत प्रचंड मोठा घोटाळा ?

विटा ( मनोज देवकर )
टेंभूच्या कालव्याच्या बाधित जमिनी खरेदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठा घोटाळा सुरू असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण टेंभू योजनेच्या कालव्याच्या जमीन खरेदी प्रक्रियेची उच्च स्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

टेंभू योजनेच्या कालव्याच्या बाधित क्षेत्रातील
जमीन खरेदी करण्याचे काम शासन सध्या करीत आहे . मात्र अनेक ठिकाणी ज्यांच्या जमिनीच गेल्या नाहीत अथवा कमी प्रमाणात गेलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या वारेमाप पद्धतीने जमिनी खरेदी करण्याचा घाट घातला जात आहे. हा शासनाला विनाकारण भुर्दंड कोणाच्या फायद्यासाठी घातला जात आहे असा संतप्त सवालही लोकांकडून विचारला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून टेंभू उपसा जलसिंचन योजनेचा कालवा गेलेल्या जमिनी म्हणजे टेंभू प्रकल्पाच्या आखणी मध्ये समाविष्ट झालेल्या जमिनी राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून खरेदी केल्या जात आहेत. त्यासाठी या कालव्यांचे माती काम आणि बांधकाम खासगी वाटाघाटी करून काही जमिनी खरेदी करण्यासाठी शासनाचे आदेश निघाले आहेत. टेंभू प्रकल्पांतर्गत टप्पा क्रमांक 3 ब ते खानापूर तासगाव कालवा किलोमीटर सहा ते अकरा मधील अशाच वाटाघाटी केलेल्या शेत जमिनींची संयुक्त मोजणी प्रमाणे आता खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

त्यादृष्टीने टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्रमांक 1 च्या कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात येत आहेत. मात्र त्यामध्ये खानापूर तालुक्यासह अनेक ठिकाणी प्रचंड अनागोंदी असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेकांच्या जमिनी प्रत्यक्ष कालव्यात गेलेल्या नसून सुद्धा त्यांना त्यांचे क्षेत्र बाधित झाले म्हणून नोटिसा आलेल्या आहेत. 

Post a comment

0 Comments