Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

खानापूर तालुक्यात पदवीधर चे ६५% तर शिक्षकचे ८२ % मतदान

विटा (मनोज देवकर )
खानापूर तालुक्यात विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी चुरशीने मतदान झाले. भाजपा व महाविकासआघाडीचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सांगली जिल्ह्यातील असल्याने मतदारसंघात चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. तालुक्यात मतदार नोंदणी केलेल्या ६५% पदवीधरांनी तर शिक्षक मतदार संघातील ८२% शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात ५०६८ पदवीधरचे तर शिक्षक चे ४११ मतदार होते.

तालुक्यात नोंदणी केलेल्या शिक्षक मतदारांची संख्या ४११ असून ५०६८ पदवीधर मतदार आहेत. तालुक्यात १३ मतदान केंद्रे व विट्यात ६ मतदान केंद्र होती. भाळवणी , विटा , लेंगरे व खानापूर येथे मतदान केंद्रे होती. सकाळपासून मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत होते.

आमदार अनिल बाबर , माजी आमदार सदाशिवराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक , युवानेते सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी बुथवर जाऊन मतदानाचा मागोवा घेतला.

Post a comment

0 Comments