Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कुपवाड मध्ये विजेच्या धक्याने एकाचा मृत्यू

कुपवाड (प्रमोद अथणिकर)
कुपवाड औधोगिक वसाहती मध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याने कुपवाड मध्ये खळबळ उडाली आहे.

कुपवाड परिसरामधील शिवनेरी नगर येथे राहणाऱ्या संतोष उर्फ बालाजी मराठे वय वर्षे 25 हा युवक गुरू कृपा या रबर कंपनी मध्ये कामास होता. तो काम करत असताना त्यास थ्री फेज विजेचा जोरात धक्का बसला. कंपनी च्या मालकांनी त्यास हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तो मृत असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती कुपवाड पोलिसांना कळवण्यात आली असून या गुन्ह्याचा अधिक तपास सपोफो घेरडे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments