Daily Mahasatta

Daily Mahasatta

तानाजी देशमुख राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

कडेगाव ( सचिन मोहिते)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणी (ता. कडेगाव) येथील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे शिक्षक श्री. तानाजी रामचंद्र देशमुख यांना 'हॅप्पी टू हेल्प' फौंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद येथील संशोधन केंद्रात नुकताच कार्यक्रम संपन्न झाला.

मराठी माध्यमाच्या  एकमेव राज्यस्तरीय पुरस्कारासाठी ५० स्पर्धकांतून त्यांची या पुरस्कारासाठी 'हॅपी टू हेल्प 'च्या निवड समितीने निवड केली. त्यांना औरंगाबादचे खासदार मा. इम्तियाज जलाल व शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांचे हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, मानाचा फेटा देऊन गौरविण्यात आले.

या पुरस्कारासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, शालेय सहशालेय , सामाजिक, राष्ट्रीय, शैक्षणिक, उपक्रमाची दखल घेतली गेली. तानाजी देशमुख यांनी सन २०१९-२० या वर्षात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय असे ११ पुरस्कार मिळवले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, विस्तार अधिकारी विकास राजे, केंद्रप्रमुख मधुकर जंगम, लक्ष्मण महापुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, संतोष जाधव, प्रतापराव पवार,  महेश पवार, बाळासो पवार, नंदकुमार पवार, दौलत माने,प्राध्यापक यु. के. मोहिते, सहकारी शिक्षक, जनार्दन मोहिते, रवींद्र पुणेकर, शहाजी पाटील, मुख्याध्यापक भिमराव पवार ,रुपाली लाकुळे, रजनी मोहिते यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments