Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सच्चा कार्यकर्ता म्हणून वैभवचा मला गर्व आहे : अॅड. सदाशिवराव पाटील

विटा (प्रतिनिधी)
" मुलगा म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहेच, त्याहीपेक्षा समाजसेवेचे व्रत घेऊन झटत असणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मला त्याचा गर्व आहे", अशा शब्दात माजी आमदार अॅड सदाशिव पाटील यांनी युवा नेते माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

आज रविवार ६ डिसेंबर रोजी विटा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा होत आहे. सोशल मीडिया आणि मिडीयातून अनेकांनी वैभव पाटील यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकला आहे. परंतु माजी आमदार अॅड सदाशिव पाटील यांनी आपल्या मुलाचे एक कार्यकर्ता म्हणून केलेले मुल्यांकन निश्चितच लक्षवेधी ठरले आहे.

माजी आमदार अॅड सदाशिव पाटील यांनी सोशल मीडियात टाकलेल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे, वैभवचा आज वाढदिवस..! कोणत्याही वडीलासाठी मुल कितीही मोठं झाले तरी लहानच असते. त्याप्रमाणे माझ्यासाठी आजही तो लहानच आहे. तो समाजकारणात सक्रिय झाल्यापासून त्याचा जीवनाकडे पाहण्याचा व्यापक व सकारात्मक दृष्टीकोन, एखाद्या घटनेतील बारकावे, चांगल्या वाईट गोष्टी, धडाडीचे निर्णय व संयम इत्यादी गुणांनी त्याचे व्यक्तिमत्व बहरत चालले आहे. जिद्द, ईर्ष्या व सर्व कामात स्वतःला झोकून देऊन समाजासाठी झटण्याचा कयास अतिशय विलक्षण आहे.

मुलगा म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहेच. त्याहीपेक्षा समाजसेवेचे व्रत घेऊन झटत असणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मला त्याचा गर्व आहे.
माझ्या वैभवला उदंड आयुष्य मिळावे व त्याच्या सर्व इच्छा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात ह्याच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा..अशा भावना माजी आमदार अॅड सदाशिव पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. 

Post a comment

0 Comments