Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

अजिंकीयन फौंडेशनच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन द्यावे : आ. सुधीरदादा गाडगीळ

सांगली ता. २९ (प्रतिनिधी)
महिलांना अजिंकियन फौंडेशनच्या माध्यमातून अधिकाधिक मदत व व प्रोत्साहन देण्यात यावे, असे झाल्यास महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असे मत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केली.

अजिंकियन फौंडेशनच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ''एषानी'' या मासिकाचे प्रकाशन आ. गाडगीळ व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत फौंडेशनच्या अध्यक्षा रीटा शहा यांनी केले. प्रास्ताविक करताना फौंडेशनच्या संस्थापिका सौ. मंजिरी गाडगीळ यांनी फाऊंडेशनची “'बास्केटक्वीन” हि वेबसाइट लवकरच तयार होत असून या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची माहिती मिळणार असल्याचे सांगितले.

पाहुण्यांचा परिचय निमिषा कल्याणी यांनी करून दिला. माजी महापौर संगीता खोत यांनी अजिंकियन फौंडेशनची अवघ्या २ वर्षातील प्रगती वाखाणण्याजोगी असल्याचे सांगितले. भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अॅड. स्वाती शिंदे यांनी अजिंकियन फौंडेशनने सर्वप्रथम महापालिकेतील सर्व नूतन नगरसेवकांना प्रशिक्षण दिले. त्यासाठी मुंबईहून चांगले वक्ते बोलावले होते. २०१८ ला स्थापन झालेल्या फौंडेशनने दिलेल्या सामाजिक योगदानाची समाजाने दखल घेतली आहे. महापुराच्या काळातही फौंडेशनने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगितले. अतिरिक्त पोलीस प्रमुख मनीषा दुबुले यांनीही फौंडेशनच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, हर्षदा कबाडे, सायली ठक्कर यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वाती भिडे यांनी '”बास्केटक्वीन” या अॅपबद्दल माहिती सांगितली.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी गेल्या २ ते ३ वर्षात फौंडेशनने ४२ उपक्रम राबवले. महापुराच्या काळातही फौंडेशनच्या महिलांनी चांगले काम केल्याचे सांगितले. यावेळी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, सभापती गीतांजली ढोपे-पाटील, स्वाती देवल यांच्यासह फौंडेशनच्या पदाधिकारी, सभासद व महिला उपस्थित होत्या. वर्षा पोळ यांनी आभार मानले.

Post a comment

0 Comments