Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगलीत भाजपचा कहर, शरद पवार यांचा वाढदिवस राष्ट्रीय भ्रष्टाचार दिन म्हणून साजरा

सांगली (प्रतिनिधी)
भाजपा तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस राष्ट्रीय भ्रष्टाचार दिन म्हणून साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस व राष्ट्रवादी त्या नेत्यांनी राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा केल्यामुळे त्याला उत्तर म्हणुन आज दिनांक 12 डिसेंबर रोजी शरदचंद्र पवार यांचा 80 वा वाढदिवस भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस दीपक माने यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या शाळा, रिसाला रोड समोर राष्ट्रीय भ्रष्टाचार दिन साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना संघटन सरचिटणीस दीपक भाऊ म्हणाले की, यापुढे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यास त्याला भारतीय जनता पार्टीतर्फे जशास तसे उत्तर दिले जाईल. यावेळी ओबीसी युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल माने, अनुसूचित जाती युवा मोर्चा अध्यक्ष अमित भोसले, व सरचिटणीस प्रथमेश वैद्य, भटक्या विमुक्त जाती अध्यक्ष राजू भाऊ जाधव, राजू मद्रासी, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सोहम जोशी, सागर ईरकर, राहुल दुधाळ, अनिकेत खिलारे,शुभम कांबळे, अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस गौसभाई पठाण , संदीप थोरात, गिरीश कांबळे, ऋषी माने, रमेश पुजारी, शुभम माने, प्रकाश मद्रासी, राहुल घोडकिया व इतर सर्वजण उपस्थित होते.

Post a comment

0 Comments