Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सार्वभौमिक मानव अधिकार परिषदेच्या माध्यमातुन गरीब मुलीचा विवाह संपन्न

सांगली ( प्रतिनिधी)
युनिव्हर्सल ह्यूमन  राइट्स कौन्सिलच्या (सार्वभौमिक मानव अधिकार परिषदेच्या) माध्यमातून आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने कुमारी महादेवी लोखंडे ह्या गरीब मुलीचा विवाह सांगली येथे संपन्न झाला. 

ह्या लग्न सोहळ्याला सांगली  जिल्ह्याला ज्ञात असणारे  सामाजिक नेतृत्व माननीय सुरज चोपडे,  श्रीमती . मनिषा  राऊत (महाराष्ट्र महासचिव आणि सांगली जिल्हा अध्यक्ष महिला), श्रीमती अनिता निकम (सांगली, कुपवाड मिरज अध्यक्ष महिला), सौ. अंजलि जगदाळे (सांगली जिल्हा उपाध्यक्ष महिला), श्री. तुषार शिंदकर (कुपवाड शहर अध्यक्ष),  पदाधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्र महासचिव मनीषा राऊत यांनी बोलताना सांगितले की यापुढे समाजातील गरीब मुला मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजन करण्याचा मानस  आहे. त्यासाठी समाजातील लोकप्रतिनिधींनी युनिव्हर्सल  ह्यूमन राइट्स कौन्सिलला सहकार्य करावे असे त्यांनी या विवाह सोहळ्याप्रसंगी सांगितले .

Post a Comment

0 Comments