Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कडेगावात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे इंधन दरवाढीचा निषेध

कडेगाव (सचिन मोहिते)
कडेगाव तालुका राष्ट्रवादी पदवीधर संघाच्यावतीने पेट्रोल - डिझेल दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आमदार अरुण (अण्णा) लाड व जिल्हा परिषद गट नेते श्री. शरद (भाऊ) लाड यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाही दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये वाढ केलेली आहे. या सततच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. गेले कित्येक महिने सर्वसामान्य जनता ही कोरोनाच्या परिस्थितीमुळे लाॅकडाऊन व रोजगार नसल्याने हैराण झाली आहे. या जनतेला योग्य निर्णय घेऊन दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार दरवाढीचा निर्णय जनतेवर लादत आहे. तरी केंद्र सरकारच्या या इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी पदवीधर संघाच्यावतीने निषेध करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ थांबवून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी कडेगाव तालुका पदवीधर राष्ट्रवादी'चे अध्यक्ष दिलीप मदने, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुरेश शिंगटे, माजी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस वैभव पवार, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष संदेश जाधव, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष पोपट मोरे, सोमनाथ पवार, कडेगाव शहराध्यक्ष परवेझ तांबोळी, कामगार सेलचे अध्यक्ष वैभव मोहिते, बाळासो वत्रे, रमेश एडके, सिकंदर मुल्ला, जगदीश देशमुख, अथर्व खाडे, अजित मुलानी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments