Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कुपवाड मध्ये गळ्याला चाकू लावून मोबाईल पळवला, एकाला अटक

कुपवाड (प्रमोद अथणिकर)
कुपवाड परिसरातील बुधगाव रोड वरती एका तरुणाच्या गळ्यावर चाकू लावून मोबाईलची जबरी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कुपवाड पोलीसांनी तातडीने कारवाई करत संशयित सुरज काळे याच्या मुसक्या आवळल्या आहेत तर दुसरा आरोपी फरार आहे.

याबाबत अधिक माहिती, कुपवाड परिसरात राहणारा स्वीकार महेश सुर्यवंशी वय वर्षे 23 रा कापसे प्लॉट कुपवाड हा कुपवाड मधील चौकामध्ये भेळ खात उभा होता. यावेळी त्याच्या जवळ संशयित आरोपी सूरज रमेश काळे व गणेश डोईफोडे दोघे रा कुपवाड हे दोघे त्याच्या जवळ जाऊन त्यास ओढत बुधगाव रस्त्या च्या दिशेने घेऊन गेले. तसेच त्याला शिवी गाळ करून त्याच्या गळ्यावर चाकू ठेऊन त्यास जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या जवळ असणारा मोबाईल काढून घेतला व ते तेथून पसार झाले आहे.

याघटने नंतर आरोपी सूरज काळे यास पकडण्यात पोलीसांना यश आले आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मोबाईल व गुन्ह्यात वापरलेला आलेला चाकू पोलिसांच्या हवाली केला आहे. मात्र दुसरा आरोपी गणेश डोईफोडे हा अद्याप फरारी आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. 

Post a comment

0 Comments