Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी राजू जानकर यांची निवड

विटा ( मनोज देवकर )
राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या प्रदेश सरचिटणीस पदी खानापूर तालुक्यातील युवानेते राजू शेठ जानकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी जानकर यांना नियुक्ती चे पत्र दिले.

राजू जानकर हे खानापूर तालुक्यातील भेंडवडे (गावठाण) गावचे रहिवासी असून गेली पाच वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. सुरवातीच्या काळात आ. गोपीचंद पडळकर यांच्या समवेत काम करत होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांना सक्रिय पाठींबा दिला होता. तेंव्हा पासून ते पाटील गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरदचंद्र पवार , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , खा. सुप्रिया सुळे यांच्या पुरोगामी विचारांवर निष्ठा ठेऊन वाटचाल करणार आहोत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू. राष्ट्रीवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे , असा विश्वास राजूशेठ जानकर यांनी व्यक्त केला आहे. 

Post a comment

0 Comments