Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड एम. आय. डी. सी. मध्ये मोफत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू : सतीश मालू

कुपवाड (प्रमोद अथणिकर)
कुपवाड एम. आय. डी. सी. मधील उद्योजक आणि कामगारांना कृष्णा व्हॅली चेंबरच्या प्रयत्नातून आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या सौजन्याने अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स सेवा शुक्रवार दिंनाक 18 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृष्णा व्हॅली चेंबरच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासूनच्या ॲम्ब्युलन्स सेवेच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. कुपवाड एम.आय.डी.सी. तील उद्योजक व कामगारांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतिश मालू व कुटंबप्रमुख शिवाजी पाटील यांनी केले आहे.

कुपवाड एम.आय.डी.सी. मधील उद्योजक व कामगार यांच्यासाठी ॲम्ब्युलन्सची सेवा गरजेची होती या परिसरात अपघात झाल्यास रूग्णांना हॉस्पीटलमध्ये घेवून जाण्यासाठी सांगली किंवा मिरज मधील ॲम्ब्युलन्सला फोन लावावा लागत असे. त्यासाठी फार काळ ताटकळत रहावे लागत असे. तसेच ॲम्ब्युलन्स वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे रूग्णांचे नाहक बळी जात असे. यासाठी कृष्णा व्हॅली चेंबर सातत्याने गेली 3 वर्षे अत्याधुनिक सर्वसोयानियुक्त अशी ॲम्ब्युलन्स मिळावी यासाठी पाठपुरावा करीत होती अखेर आमच्या या पाठपुराव्यास यश प्राप्त झाले आहे. नवीन आलेली ॲम्ब्युलन्सही वातानुकुलित, अत्याधुनिक स्ट्रेचर, प्राथोमपचार सुविधा व ऑक्सिजन सेवेसह उपलब्ध आहे. ही ॲम्ब्युलन्स कुपवाड एम.आय.डी.सी. मधील अग्निशमन केंद्रात कार्यरत आहे. उद्याटन प्रसंगी अध्यक्ष मालू म्हणाले की, कृष्णा व्हॅली चेंबर ही संस्था उद्योजकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत असते. कृष्णा व्हॅली चेंबरने लॉकडाउन काळात उद्योजकांचे अनेक कठीण प्रश्न सोडविले आहेत यापुढील कालावधीतही उद्योजकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार आहे.

नवीन ॲम्ब्युलन्सचे उद्घाटन करताना कृष्णा व्हॅली चेंबरचे चेअरमन सतिश मालू, व्हा. चेअरमन रमेश आरवाडे फायर स्टेशनचे अग्निशमन अधिकारी आर.जी. ब्राम्हणकर, अग्निशमन विमोचक एम.जे, जर्फे, पी.ए. साळुंखे, टी.जी. चव्हाण, ए.ए. चौधरी, टी.डी. पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments