Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शासनातर्फे सवलती मिळाव्यात; मराठा क्रांती मोर्चाची मागणी.

कडेगाव (सचिन मोहिते)
कडेगाव तालुका मराठा क्रांती मोर्चा तर्फे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शासनातर्फे विविध सवलती मिळाव्यात अशा मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी यांना देण्यात आले आहे .

निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश फी, परीक्षा फी, तसेच कॉलेज तर्फे आकारले जाणारे विविध शुल्क यात सवलत मिळावी. बस सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात यावी, विद्यार्थ्यांना राहण्यासाठी होस्टेलची सवलतीच्या दरात सोय करावी, मुलींच्या सुरक्षेसाठी कॉलेज व बस स्टँड परिसरात कॉलेज सुरू होण्यापूर्वी व कॉलेज सुटल्यानंतर पोलिस नेमणूक करण्यात यावी. तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी या वर्षी साठी पुस्तके व इतर साहित्य मोफत मिळावे , अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग करणार्‍या लोकांचे वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यासह इतर मागण्याचे निवेदन प्रांत अधिकारी गणेश मरकड यांना देण्यात आले . यावेळी अँड. प्रमोद पाटील, डॉ. विजय महाडिक, अँड. संतोष जाधव, श्री प्रमोद मांडवे, अँड. मनोज देशमुख, अमोल महाडिक, ओंकार महाडिक, विवेक ननवरे, वैभव हणमर व कार्यकर्ते हजर होते.

Post a comment

0 Comments