Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

बामणोली व्यापारी संघटनेचा वार्षिक स्नेह मेळावा संपन्न

कुपवाड (प्रमोद अथणिकर)
सोमवार दिनांक 28 रोजी बामणोली व्यापारी संघटनेचा वार्षिक स्नेह मेळावा माधवनगर येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्यापारी संघटनेचे नेते मा अनिल कवठेकर उपस्थित होते. बामणोली व्यापारी संघटने साठी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मार्गदर्शन करू असे ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी कुपवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मा अमर दिडवळ उपस्थित होते.

यावेळी बामणोली व्यापारी संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या मध्ये अध्यक्ष पदी मा संतोष सरगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली, उपाध्यक्षपदी मा जगन्नाथ पाटील, दुंडाप्पा पारशे, सचिव पदी मनोज ठेंगील, सह सचिव पदी आदिनाथ नरोटे, खजिनदार पदी मा रोहित शिंदकर, सह खजिनदार पदी मा संजय पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना रोपे देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष संतोष सरगर यांनी स्वागत केले. व्यापारी संघटनेची सविस्तर कार्यप्रणाली सांगितली. संघटनेने महापूराच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदान केले होते. कोरोना च्या काळात बामणोली येथील गरीब गरजू लोकांना 40 ते 50 कुटुंब यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आली होती याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

मेळाव्यासाठी सुनील पाटील, राजू जाधव, पांडुरंग शिंदे, राम बामणे, महादेव पाटील, सदाशिव माळकोटी, अमोल बामणे, बाळासाहेब मलमे, प्रवीण मिरजकर व प्रमोद अथनिकर याच्या सह सर्व व्यापारी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. आभार दीपक माळी यांनी मानले.

Post a comment

0 Comments