Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

जतमध्ये १ लाख ८० हजारांचा दारू साठा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

जत (सोमनिंग कोळी )
जत तालुक्यातील आसंगीतुर्क येथे सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा बेकायदेशीर बियरचा दारू  साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केली.

पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी सांगली जिल्हयातील सर्व अंवैद्य धंदे याची माहिती काढुन त्याचेवर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी अवैद्य धंद्यांवरती कारवाई करणेसाठी पथक तयार केले होते. त्याअनुषंगाने जत विभागात पेट्रोलींग करीत अवैद्य धंदे याची माहिती घेत असताना सहा. पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना त्यांचे खास बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, मिरासाब मुजावर हा आसर्गी गावी आपल्या घराशेजारी बसुन बिअरच्या बाटल्या विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाली. मिळाले माहिती प्रमाणे वरील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी आसर्गी गावी मिरासाब मुजावर याचे घराशेजारी छापा मारुन बिअर विकणा-या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव मिरासाहेब मोदिन मुजावर (वय-२८ रा. आसंगी तुर्क ता. जत) असे सागितले.

त्यावेळी त्याचे कब्जात नॉकआऊट पंच कंपनीच्या ६५० मिलीच्या विअरचे ६३ बॉक्स किमत रुपये १ लाख ५१ हजार २०० रूपये व नॉकआऊट पंच कंपनीच्या ३३० मिलीच्या बिअरचे १२ बॉक्स किमत रुपये २८ हजार ८०० रूपये असा एकूण १ लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल मिळाला. तो सविस्तर पंचनाम्याने सहा. पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी उमदी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ उ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व मुदेदमाल पुढील तपासा कामी उमदी पोलीस ठाणे येथे रिपोर्ट जमा करण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, जितेद्र जाधव, आमसिध्दा खोत, मच्छिंद्र बर्डे, सतिश अलदर, राहुल जाधव, गुदतरार पाथरवट, राजु शिरोळकर बजंरग शिरतोडे यांनी केली.


 

Post a comment

0 Comments