Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

रेशनकार्डशी मोबाईल आणि आधार कार्ड नंबर संलग्न करणे अनिवार्य

: एक राष्ट्र एकच रेशनकार्ड योजने अंतर्गत कुठेही घेता येणार धान्य
विटा ( मनोज देवकर )
जानेवारी अखेर " एक राष्ट्र , एकच रेशनकार्ड" योजने अंतर्गत आधार कार्ड व मोबाईल नंबर नोंद करावी लागणार असल्याची माहिती तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी दिली. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ज्या लाभधारकांनी आधार व मोबाईल नंबर सिडिंग केलेले नाही त्यांनी रेशन दुकानदाराकडे "इ के वाय सी " पूर्ण करायची आहे. या योजने अंतर्गत देशात कुठेही धान्य घेता येणार आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेतील ३७९०९९ कार्ड धारकांपैकी ८४ % लाभार्थ्यांचे आधार सिडिंग झाले आहे. अंत्योदय योजनेतील ८२ % लाभार्थ्यांचे आधार जोडणी झाली आहे. वैध मोबाईल नंबर, रेशनकार्ड व आधार कार्ड जोडणी आवश्यक असून ती ३१ जानेवारी २०२१ अखेर करावी लागणार आहे.

" जानेवारी अखेर रास्त भाव दुकानात जाऊन लाभार्थ्यांनी इ पॉस मशीनवर इ के वाय सी ची प्रक्रिया पूर्ण करावी. आधार व वैध मोबाईल न नोंदल्यास सदर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही तरी लाभार्थ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी केले आहे. 

Post a comment

0 Comments