Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

विट्यात पिस्तुल विक्रीस आलेल्या दोघांना अटक

विटा ( मनोज देवकर )
गावठी बनावटीचे पिस्तुल व त्याच्या गोळ्या ( राऊंड) विक्रीसाठी विट्यात आलेल्या दोघांना विटा पोलिसांनी रंगेहात पकडले. सचिन बापूसो चव्हाण ( वय ३५) व अजित दुर्योधन चव्हाण ( वय ३४ ) दोघेही रा. विहापुर ता. कडेगाव या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तालुक्यात सोळा ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या चालणारी शस्त्रांची तस्करी, तसेच विना परवाना , बेकायदेशीर रित्या शस्त्र जवळ बाळगणारे इसमांचेवर कारवाई करण्यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. सोमवारी रात्री विटा तासगाव रोड वरील एस्सार पेट्रोल पंपानजीक दोघेजण गावठी बनावटीचे पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती विटा पोलिसांना कळली होती. सदरची माहिती मिळताच पो. नि. श्री रवींद्र शेळके यांनी तात्काळ पोलीस पथकासह सापळा रचून दोघांना रंगेहात पकडले.

सदर इसमांच्या ताब्यातून एक गावठी मॅगझीन असलेले पिस्टल अंदाजे किंमत रुपये तीस हजार , व जिवंत २ राऊंड अंदाजे किंमत १००० रुपये, व ६० हजार रुपयांची हिरो होंडा मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींचे विरुद्ध भा. आर्म्स ऍक्ट १९५९ चे कलम ३, ५, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी पो. नि. रवींद्र शेळके , पो ना. भिंगारदेवें , गायकवाड , पो. कॉ. यादव ,पाटील , देवकाते, कुंभार , कॅप्टनसाहेब गुंडवडे यांनी पार पाडली.

Post a comment

0 Comments