Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

हरिपूर - कोथळी पुलाचे काम अंतिम टप्यात : आ. सुधीरदादा गाडगीळ

 सांगली ( प्रतिनिधी )
हरिपूर - कोथळी पुलाचे काम गतीने सुरु असून आज आ. सुधीर गाडगीळ यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह या कामाची पाहणी केली. लवकरच हा पूल पूर्णत्वास येईल. सांगली व कोल्हापूरच्या जनतेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होईल, असे मत आ. गाडगीळ यांनी व्यक्त केले.

हरिपूर-कोथळी पुलाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी भाजप सरकारच्या काळात या पुलाला मान्यता व निधी शासनाकडून मंजूर करून आणला. यासाठी सुमारे २५ कोटींचा खर्च येणार आहे. या पुलामुळे सांगलीकरांचे अंतर १५ ते २० कि. मी. ने कमी होणार आहे. हा पूल रत्नागिरी महामार्गाला जोडणार आहे. आ. गाडगीळ यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी कोथळी बाजूकडील सात पिलर तयार झाले असून सध्या गर्डर लॉन्चिंगचे काम प्रगतीत आहे. हरिपूर बाजूकडील तीन पिलरचे पाइल मारण्याचे काम सुरू आहे.

पावसाळ्यापूर्वी सदर पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सांगण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, उपअभियंता कीर्तीकुमार मिरजकर, कनिष्ठ अभियंता अभय क्षीरसागर तसेच मनोजा स्थापत्यचे बाजीराव मुसळे यांनी पुढील वर्षी जूनमध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती दिली.

यावेळी हरीपुरचे सरपंच विकास हणबर, अल्पसंख्यांक प्रदेश चिटणीस अशरफ वांकर, सांगली शहर संघटन सरचिटणीस दीपक माने, सचिव विश्वजीत पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष कृष्णा राठोड, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य चेतन माडगुळकर, ग्रामीण मंडल अध्यक्ष संतोष सरगर, रवींद्र बाबर, सतीश खंडागळे, गणपती साळुंखे आदी हरीपुर व कोथळी गावचे नागरिक उपस्थित होते.

Post a comment

0 Comments