Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सम्राट महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे १ लाखांचा भांडी संच भेट

पेठ ( रियाज मुल्ला)
युवानेते सम्राट महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त
मा. आसिफ जकाते (भैय्या) यांच्या कडून सुमारे 1 लाख रुपये किंमतीचे भांडी संच पेठ येथील मुस्लिम समाजाला भेट देण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्राट महाडिक होते. यावेळी बोलताना सम्राट महाडिक म्हणाले की महाडिक कुटुंबाबवर नेहमीच मुस्लिम समाजाचे प्रेम राहिले आहे. महाडिक कुटुंब अन मुस्लिम समाजाची नाळ नेहमीच जुळून राहिलेली असून मुस्लिम समाजाच्या प्रत्येक कार्यात माझी मदत नेहमीच राहील.

या प्रसंगी पेठ मुस्लिम समाजाचे चेअरमन जावेद ढगे , व्हा. चेअरमन इसाक संदे, सल्लागार समितीचे सदस्य फिरोज ढगे, माजी चेअरमन अमीर ढगे, संचालक इरफान ढगे , आयुब जमादार,मुसा ढगे , रमजान मुल्ला, हा. आसिफ जमादार, मौ. रिजवान जमादार, नौशाद मुल्ला, फिरोज मुल्ला, जब्बार मुल्ला, इरफान जकाते आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments