Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोट्यावधीच्या सोने तस्करी प्रकरणी खानापूर तालुक्यातील व्यापार्यांची चौकशी होणार

 विटा ( मनोज देवकर )
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चार महिन्यांपूर्वी सोन्याची तस्करी करताना आठजणांना अटक करण्यात आली होती. ते आठही जण सांगली जिल्ह्यातील खानापूर व आटपाडी तालुक्‍यातील असल्याचे स्पष्ट झाले होते . त्यानंतर सीमा शुल्क विभाग, केंद्रीय जीएसटी यांच्या संयुक्त पथकाने आटपाडी तालुक्‍यात छापे टाकले होते. तसेच एनआयए च्या दहा जणांच्या पथकाने देखील खानापूर तालुक्‍यात छापे टाकले होते. आता सदर प्रकरणातील आरोपींच्या संपर्कातील सोने चांदीच्या व्यापाऱ्यांची एन. आय. ए चौकशी करणार आहे.

खानापूर तालुक्यातील काही व्यापाऱ्यांना हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आले आहेत. बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा १९६७ अंतर्गत सदर प्रकरणात गुन्हे नोंद झाले आहेत. क्रिमिनल कोड प्रोसिजर १२ अंतर्गत व्यापाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.

नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकावरुन 8 जणांकडून 42.89 कोटी रुपयांचे 83.624 किलो वजनाची 504 सोन्याची बिस्किटे 'डीआरआय'ने जप्त केली होती. .संशयितांनी म्यानमार येथून मणिपूरच्या सीमेवरून सोन्याची तस्करी केल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. संबंधित आरोपींनी बोगस आधार कार्ड चा वापर प्रवास करण्यासाठी केला होता.

Post a Comment

0 Comments