Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सम्राट महाडिक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

पेठ (रियाज मुल्ला )
भाजप कार्यसमितीचे सदस्य सम्राट महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त पेठ येथील महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष महेश कदम यांनी समाजीक बांधिलकी जोपासत अनाथ आश्रमास भेट देऊन जेवण, लहान मुलांना खाऊ तसेच अन्नधान्याचे वाटप केले.

सम्राट महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कराड येथील जिजाऊ अनाथआश्रम ला भेट देत एक सामाजिक जबाबदारी या नात्याने अनाथआश्रमला धान्य,जेवण व खाऊ वाटप करण्यात आले. नेहमीच वेगळवेगळ्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे महेश कदम यांनी स्वखर्चातून एक वेगळ्या प्रकारे प्रेरणादायी उपक्रम राबवत सम्राट महाडिक यांचा वाढदिवस साजरा केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

यावेळी समीर नदाफ, विष्णू शिंगारे, अनिकेत कदम, अभि कदम, अक्षय भोसले,समर्थ कदम,सुरज साळुंखे, रवी गुरव आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments