Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

‌प्रमिला चौगुले ज्ञानदायिनी गौरव पुरस्काराने सन्मानित

सांगली (प्रतिनिधी)
येथील नव महाराष्ट्र हायस्कूल लक्ष्मी देऊळच्या शिक्षिका प्रमिला सतिश चौगुले यांना त्यांच्या आदर्शवत शैक्षणिक कार्याबद्दल ज्ञानदायिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली निलेश चाकणकर यांचे हस्ते सौ. चौगुले यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत व्यक्तीचा सत्कार करण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षिका म्हणून ज्ञानदायिनी पुरस्कारासाठी प्रमिला चौगुले यांची निवड करण्यात आली होती. या पुरस्काराबद्दल सौ. चौगुले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a comment

0 Comments