Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

‘कु. प्रीति जगदेव ची वैश्विक भरारी’, जगातील २५ शास्त्रज्ञात समावेश

सांगली (प्रतिनिधी)
गोवा येथील एम. ई. एस. ज्युनिअर कॉलेजमधील कॉमर्स चे प्राध्यापक व नवनिर्माण दिगंबर जैन मंडळ ट्रस्ट, मडगाव-गोवा चे फाउंडर ट्रस्टी श्री. महावीर कल्लाप्पा जगदेव (बेडकीहाळ) व गुरु परिवार, सांगलीच्या आजीव सदस्या सौ. पद्मजा महावीर जगदेव यांची कनिष्ठ सुकन्या कु. प्रीति महावीर जगदेव हिची ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर ऑप्टिक्स & फोटोनिक्स (एसपीआयई) अमेरिका यांच्यावतीने ऑप्टिक्स या विषयातील संशोधनासाठी २०२१ सालाकरिता निवडलेल्या जगभरातील २५ शास्त्रज्ञांमध्ये भारतातील एसपीआयईच्या ३२ विभागातून एनआयटी गोवाच्या तरुण संशोधक कु. प्रीति जगदेव हिच्या एकमेव नावाचा समावेश करण्यात आला आहे.

सदर उज्वल यश संपादन केल्याबद्दल नुकतेच सांगली येथील राजमती भवन मध्ये भारतीय जैन संघटना व गुरु परिवार, सांगली यांच्यावतीने भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य, माजी महापौर मा. सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश पाटील यांनी समाजातील अशा विविध गुणी, बुद्धिमान व अष्टपैलू युवक-युवतींना सर्व क्षेत्रातील संशोधन कार्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करून, अशा होतकरू तरुण-तरुणींना सर्व तर्‍हेचे सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन दिले. सदर सत्कार प्रसंगी भारतीय जैन संघटनेचे राज्य संचालक राजगोंडा पाटील व जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील, व गुरु परिवारचे धन्यकुमार शेट्टी, सौ. सरोज शेट्टी, रावसाहेब माणकापूरे, संजीव उपाध्ये, सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर व्ही. डी. वाजे, बीजेएस चे EOG ट्रेनर्स व अन्य नागरिक उपस्थित होते.
कु. प्रीति हिचे प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षण सेंट जोसेफ इन्स्टिट्यूट वास्को व एम. ई. एस. ज्युनिअर कॉलेज गोवा येथे झाले. त्यानंतर तिने डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनियरिंग गोवा मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा विषय घेवून उच्च गुणवत्ता क्रमांकाने बी.ई. ही पदवी प्राप्त केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अँड इन्स्ट्रुमेन्टेशन हा विषय घेऊन गोवा इंजिनिअरिंग कॉलेजमधून M.E. ही पदव्युत्तर पदवी डिस्टिंक्शन मध्ये प्राप्त केली. नंतर अखिल भारतीय पातळीवर संशोधन करण्याच्या उच्च महत्त्वाकांक्षेने तिने गुणवत्तेनुसार प्रवेश असलेल्या एन. आय. टी. गोवा या संस्थेत डॉक्टरेट मिळवण्यासाठी प्रवेश घेतला. एन. आय. टी. गोवासाठी पीएचडी स्कॉलर म्हणून निवड झाल्यानंतर एन. आय. टी. चे डायरेक्टर श्री. गोपाळ मुगेराया व रिसर्च गाईड डॉ. ललाट इंदू गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच तिची सदर बहुमानासाठी निवड झाली. याचदरम्यान तिने गतवर्षी ‘ब्राझील’ येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून संशोधन पेपर सादर करून ‘एन. आय. टी.’ गोवाचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. तसेच टोकिओ, अमेरिका व भारतात सुद्धा संशोधन पेपर सादर केले आहेत.
मुख्य कार्यालय अमेरिका असलेली ‘एसपीआयई’ ही संस्था १९५५ पासून १८३ देशात काम करीत असून भारतात तिचे ३२ विभाग आहेत. ‘एसपीआयई’ ही संस्था जगभरातील ऑप्टिक्स सायन्स, इंजिनियरिंग व गणित या क्षेत्रामध्ये आपल्या संशोधन कार्याद्वारे अत्युच्च योगदान देणाऱ्या २५ महिलांची जागतिक स्तरावर प्रत्येक वर्षी निवड करीत असते, त्यात नासा व इतर नामवंत संशोधन संस्थेमधील महिलांचा समावेश असतो. त्यात यावर्षी भारतातून एकमेव तरुण शास्त्रज्ञ म्हणून कु. प्रीति जगदेव हिची निवड करण्यात आली आहे.
---------------------------

कु. प्रीति जगदेवचे थर्मोग्राफिक संशोधन

कु. प्रीति जगदेव ही ‘एनआयटी’ गोवामध्ये डिपार्टमेंट ऑफ ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ मध्ये संशोधन करीत असून तिने नुकतेच ‘इन्फ्रारेड थर्मोग्राफी’ व ‘कृत्रिम बुद्धिमत्तेची’ मानवी आरोग्य नियंत्रणात उपयुक्तता या विषयावर संशोधन करीत आहे. थर्मोग्राफी’ ही इन्फ्रारेड कॅमेराद्वारे केली जाणारी चाचणी असून, त्याद्वारा रक्तप्रवाह आणि शरीरातील उतीचा उपयोग यांचे नमुने तपासता येतात. तसेच याचा स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी सुद्धा उपयोग आहे. जगभरातील संशोधक इन्फ्रारेड कॅमेऱ्यावर काम करीत असून, त्याद्वारे कातडीच्या तापमानातील तफावततीची नोंद करणे सुद्धा शक्य आहे.

तिच्या या उत्तुंग यशाची दखल घेऊन केंद्रीय शिक्षणमंत्री मा. ना. रमेश पोखरियाल निशांक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वास्को चे आमदार कार्लूस अलमेडा, नगरसेवक दीपक नाईक व अन्य नामवंत शिक्षणसंस्थांनी खास अभिनंदन केले आहे.

Post a comment

0 Comments