Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाडचा ४९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

कुपवाड ( प्रमोद अथणिकर)
नव महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, न्यू प्रायमरी स्कूल, लाल बहादूर बालकमंदिर, अकुज प्री-प्रायमरी, प्रायमरी स्कूल, अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड (सांगली) यांचे संयुक्त विद्यमाने संस्थेचा ४९ वा वर्धापन दिन दि. १७ डिसेंबर २०२० रोजी मोठ्या उत्साहात व आनंदात तारक सभागृह येथे संपन्न झाला.

वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरूवात ध्वजारोहण करून झाली. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थीनींनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले. संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये सर यांनी उपस्थित प्रमुख पाहूण्यांचे स्वागत, प्रास्ताविक केले व संस्थेच्या ४९ वर्षाचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून स्मृती पाटील - उपायुक्त, निरज उबाळे सहा. पोलिस निरीक्षक, डॉ. सुभाष पाटील, डॉ. विनोद परमशेट्टी, नगरसेवक शेडजी मोहिते व प्रकाश ढंग हे उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून, संस्थेत शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रम हे अतिशय स्तुत्य असल्याचे सांगत,संस्थेच्या ४९ व्या वर्धापनानिमित्त संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच वर्धापन दिनाचे औचित्य साधुन सांगली, मिरज आणि कुपवाड भागात कोविड १९ मध्ये अविरत असे निश्वार्थी भावनेने कार्य केलेल्या व्यक्तींचा व संस्थांचा कोव्हीड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यामध्ये
मा. स्मृति पाटील- उपायुक्त, सां. मि. कु. महानगरपालिका
मा. श्री. निरज उबाळे - पोलिस उपनिरीक्षक, कुपवाड पोलिस ठाणे
मा. डॉ. विनोद परमशेट्टी - परमशेट्टी हॉस्पिटल, मिरज
मा. डॉ. राम लाडे - विवेकानंद वैदयक प्रतिष्ठान, बामणोली
मा. डॉ. पूनम उपाध्ये - विश्वरूप क्लिनीक, कुपवाड
मा. श्री. मुस्तफा मुजावर - सावली बेघर निवारा केंद्र, सांगली
मा. श्री. रितेश शेठ - सामाजिक कार्यकर्ते
मा. श्री. अभिजीत भोसले- नगरसेवक
मा. डॉ. राहूल सुर्वे - संजीवनी हॉस्पिटल, कुपवाड
मा. डॉ. सागर मोरे - दिशा पॅथॅलॉजी, कुपवाड
मा. श्री. अमोल पाटील - आयुष सेवाभावी संस्था, कुपवाड
मा. श्री. उमेश भोसले - उमेश मेडिकल, डायरेक्टर संजीवनी मल्टीस्पेशालिटी,
श्री. राजाराम पाटील - सुशील मेडिकल, कुपवाड
मा. श्री. नितीन संगमे - गोमटेश दुग्धालय, कुपवाड
मा. श्री. प्रशांत पाटील - भाजी विक्रेते
यांचा “कोविड योध्दा” म्हणुन सन्मानपत्र देवुन सन्मान करण्यात आला.

सन्मानप्राप्त व्यक्तींनी आपल्या भाषणातून संस्थेचे आभार मानले व संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी, मुख्याध्यापक, आजी- माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विभाग प्रमुख, उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक शिरीष चिरमे, कुंदन जमदाडे, ज्योती पाटील, चंदन शहा यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्री. माळी डि. एम व सुत्र संचलन श्री. चंदन शहा व कु. पाटील एस. एस यांनी केले.

Post a comment

0 Comments