Daily Mahasatta

Daily Mahasatta

बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी पोलिस निरिक्षक अखेर शरण आला

कडेगाव (सचिन मोहिते)
स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन करण्याचे आमिष दाखवून २८ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना कडेगाव येथे उघडकीस आली होती. याप्रकरणातील संशयित आरोपी पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस हा चार महिन्यानंतर अखेर पोलीसांना शरण आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, 28 ऑगस्ट 2020 रोजी 28 वर्षीय तरुणीला स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्याचे आमिष दाखवून कडेगाव येथे बलात्कार केल्याप्रकरणी चार महिने पसार झालेला पोलिस निरीक्षक विपिन वेंकटेश हसबनिस वय ५४ वर्ष रा. मोरेवाडी , तालुका करवीर ,जिल्हा कोल्हापूर हा पोलिसांना शरण आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता.

त्यानंतर हसबनीस यांने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालय सरकारतर्फे पिडितेच्याच्या बाजूने ठोस असा युक्तिवाद करण्यात आला. त्यानूसार दोन दिवसांपूर्वी निरीक्षक हसबणीस याचा उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे संशयित हसबनिस हा फरारच राहणार की पोलिसांना शरण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हसबनिस आज पोलीस ठाण्यात शरण आला असुन त्याला तत्काळ अटक करण्यात आली असून तासगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडे याचा तपास करीत आहेत. दुपारनंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments