कडेगाव, ( सचिन मोहिते )
डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड मोहनराव कदम नगर वांगी या कारखान्याच्या कार्यस्थळावर सन 2020 -21 मधील ऊस गाळपा करिता आलेल्या ट्रॅक्टर, ट्रेलर, बैलगाडी, ट्रक यासह ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी म्हणून रिफ्लेक्टर बसवण्याचा शुभारंभ चिंचणी वांगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या शुभहस्ते करण्यात आला . या कार्यक्रमाचे नियोजन केन यार्ड सुपरवायझर शिवाजी सूर्यवंशी यांनी केले होते.
यावेळी बोलताना संतोष गोसावी म्हणाले, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रतिवर्षी रिफ्लेक्टर बसवण्याचा कार्यक्रम आपल्या कारखान्यामार्फत घेतला जातो याचा उद्देश एकच आहे की रात्रीची वेळ पाठीमागून येणाऱ्या वाहनधारकांना पुढील वाहन दिसावे . दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले असुन . वाहनधारकांनी सर्व नियमांचे कायद्याचे पालन करून ऊस वाहतूक करावी . याप्रसंगी कारखान्याचे शेती अधिकारी प्रशांत कणसे, वाहन प्रमुख गणपती कदम ,सुरक्षा अधिकारी राजाराम जाधव, तसेच चिंचणी पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल अमर जंगम . शेती अधिकारी वैभव जाधव अरुण निकम, वाहतूकदार विशाल सरडे ,नानासाहेब सावंत, शिवाजी सावंत, तसेच वाहनधारक व बैलगाडीवान मोठ्या संख्येने उपस्थित होते .

0 Comments